आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्यांचा भाजतातर्फे सत्कार

रत्नागिरी: भारताच्या इतिहासात २५ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणीबाणी जाहीर केली. ही लोकशाहीची एकप्रकारे निर्घृण हत्याच होती. मीसा कायद्याखाली अनेक निरपराध नागरिकांना २१ महिने कारागृहात डांबून ठेवले. यामध्ये रत्नागिरी शहरातील अनेक जणांना तुरुंगवास भोगावा लागला. यातील काही व्यक्तींचा सत्कार रत्नागिरी शहर भाजपातर्फे करण्यात आला.

 

 

आणीबाणीमध्ये विरोधकांचा आवाज चिरडून टाकण्यासाठी सर्वांना कारागृहात डांबण्यात आले. या काळात रत्नागिरीतील सुभाष राणे, श्री. सुर्वे, श्रीकांत मुकादम, अॅड. बाबासाहेब परुळेकर, विवेक भावे, डॉ. संजय केतकर यांनीही कारावास भोगला. या काळ्या दिवसाला पन्नास वर्षे झाली. त्यानिमित्त रत्नागिरी शहर भाजपातर्फे या सर्वांच्या घरी जाऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. जिल्हा संयोजक प्रशांत डिंगणकर, रत्नागिरी शहर संयोजक संदीप रसाळ, शहराध्यक्ष राजन फाळके, शहर सरचिटणीस राजन पटवर्धन, जिल्हा चिटणीस दादा ढेकणे, वर्षा ढेकणे, सौ. सत्यवती बोरकर यांनी गुलाबपुष्प देऊन या व्यक्तींना सन्मानित केले.