यशवंत विद्यालय धामणंद येथे शिक्षक पालक सभा उत्साहात

 

चिपळूण ( वार्ताहर ) : खेड तालुक्यातील पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था धामणंद संचलित यशवंत विद्यालय धामणंद या शाळेत नुकतीच शिक्षक पालक सभा मुख्याध्यापक श्री सुभाष पाटील सर यांच्या अध्यक्ष खाली संपन्न झाली.
या सभेला उपस्थित पालक वर्गाचे, सर्व समिती सदस्य यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले, त्यानंतर मागील सभेचे इतिवृत्त सौं मीना घाडगे यांनी सादर केले .
त्यानंतर खालील विषयावर चर्चा करण्यात आली, शालेय शिस्त व कार्यवाही , शालेय उप्रक्रम ,
स्पर्धा परीक्षा चे नियोजन,
वृक्ष दिंडी, वृक्ष रोपण, वर्षा, सहल चे आयोजन, शालेय विदयार्थी ना शिष्य वृत्ती, मोफत पास, दत्तक पाल्य योजना,
आदी विषयावर चर्चा करण्यात आली. विद्यार्थीच्या गुणवत्ते साठी अभ्यासिका, चर्चा सत्र आयोजित करण्यात यावीत, असे ठरविण्यात आले..

 

 

शाळा व्यवस्थापन समिती, परिवहन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ,,, अशा विविध समिती स्थापन करण्यात आल्या
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा म्हणून सौं अनिशा सचिन म्हापदी यांची निवड करण्यात आली
यावेळी वैभव पालांडे, प्रदीप थोरे, सुनील जंगम, सौं नंम्रता सुतार, सौं श्रद्धा सावंत. सौं अनिशा म्हापदी, आणि पालक वर्ग उपस्थित होते
शेवटी मुख्याध्यापक सुभाष पाटील यांनी शाळेच्या विकासासाठी सर्वांनी सह कार्य करावे. असे सांगितले. सभेचे सूत्रसंचालन प्राजक्ता सावंत आणि आभार मीना घाडगे यांनी केले