वैभववाडी रोटरी क्लबची सामाजिक बांधिलकी

 

रेल्वे स्टेशनवरील एक हजार प्रवाशांना दिला मोफत अल्पोपहार

वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी रेल्वे स्टेशनवर तब्बल बारा तास अडकलेल्या मंगलोर एक्स्प्रेस मधील प्रवाशांच्या मदतीसाठी वैभववाडी रोटरी क्लब पुढे सरसावला आहे. रेल्वेमधील जवळपास एक हजार प्रवाशांना रोटरी क्लबने मोफत अल्पोपहारची सोय उपलब्ध करून दिली आहे. सर्व प्रवाशांना बिस्कीट पुडे व पाणी बॉटल उपलब्ध करून दिल्या बद्दल प्रवाशांनी रोटरीचे आभार मानले. तासनतास ताटकळत बसलेल्या प्रवाशांकडे रेल्वे प्रशासनाने जरी पाठ फिरवली तरी रोटरी क्लबने मात्र आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
दिवाणखवटीजवळ दरड रेल्वे रुळावर आल्याने कोकण रेल्वे ठप्प झाली. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्या सर्व स्टेशनवर थांबवण्यात आल्या.

 

 

राजापूर, रत्नागिरी स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी देखील रत्नागिरीतील रोटरी क्लब ने मदतीचा हात दिला. तर वैभववाडी रेल्वे स्टेशनवर थांबलेल्या मंगलोर एक्स्प्रेस मधील प्रवाशांना रोटरी क्लब ने मोफत अल्पोपहार उपलब्ध करून दिला आहे. सहकार्याबद्दल स्टेशन मास्तर यांनी रोटरी क्लबचे आभार मानले.
यावेळी रोटरी क्लब वैभववाडी चार्टर्ड प्रेसिडेंट संतोष टक्के, माजी प्रेसिडेंट संजय रावराणे, रोटरीयन मंगेश कदम, मुकुंद रावराणे, मंगेश कदम, प्रशांत कुलये, संदीप मोरे, शैलेंद्र भोवड, श्रीशांत रावराणे, मंथन टक्के, मनोज सावंत, मोहिनी मोरे, स्नेहल खांबल, गंगाधर केळकर आदी उपस्थित होते. तसेच याप्रसंगी पोलीस निरीक्षक श्री अवसरमोल, इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी, तहसील कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.