खासदार नारायण राणे, परिषद आमदार निरंजन डावखरे 

 

एक गाव एक शाळा विषयावर डी पी डी सी मध्ये चर्चा

जिल्हा नियोजन समिती बैठक

ओरोस :जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार नारायण राणे, परिषद आमदार निरंजन डावखरे यांच्या अभिनंदनाचा ठराव सभागृहात सर्वानुमते मंजूर करण्यात आला. याबाबत जिल्हाधिकारी यांनी तो ठराव मांडला.नियोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तो मंजूर केला.

गेली दहा वर्षे एक गाव एक शाळा ही चर्चा होते मात्र सभागृहाच्या बाहेर गेल्यावर ही भूमिका राहिली नाही.७० विद्यार्थी १७ शिक्षक अशी स्थिती आहे. हे संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी निदर्शनात आणून दिले.तर सावळाराम अनावकर यांनी एक गाव एक शाळा झाली पाहिजे अशी मागणी केली.