संतोष कोत्रे l लांजा :- तालुका महावितरण कार्यालयाकडे वीज मीटरची गेल्या अनेक दिवसांपासून वानवा असून वीज मीटर उपलब्ध होत नसल्याने ग्राहकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत मुचकुंदी परिसर विकास संघ ग्रामीण उपाध्यक्ष गणेश खानविलकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
लांजा महावितरण कार्यालय हे सद्या वीज ग्राहकांसाठी गैर सोयिंचे केंद्र बनले आहे. पावसाला सुरुवात झाल्यानंतर वीज पुरवठा खंडीत च्या प्रकाराने जनता हैराण झालेली असतानाच या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून वीज मीटर उपलब्ध नसल्याची बाब ही प्रकर्शाने पुढे आली आहे. याबाबत गणेश खानविलकर यांनी सांगितले आपण स्वतः याबाबत महावितरणच्या लांजा कार्यालयाशी संपर्क साधा होता मात्र त्यांच्याकडे वीज मीटर उपलब्ध नसल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्याकडून देण्यात आली. मागणीच्या तुलनेत वीज मीटरच उपलब्ध होत नसतील तर ग्राहकाने जायचे कुठे?असा सवाल गणेश खानविलकर यांनी उपस्थित केला आहे गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचा हा भोंगळ कारभार सुरू आहे
आधीच महावितरणच्या खंडीत वीस पुरवठ्यामुळे तालुक्यातील वीज ग्राहक हैराण झालेले आहेत त्यात वेळेवर वीज मीटर उपलब्ध होत नसतील आणि ते ग्राहकांना मिळत नसतील तर महावितरण तालुका कार्यालयाचा उपयोग काय?असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सातत्याने असे प्रकार हे महावितरणकडून सुरु असून त्याचा फटका हा तालुक्याचा जनतेला बसत आहे आणि याचा उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कार्यालय असणार आहे.
अशाच प्रकारे लांजा तालुक्यातील गोळवशी गावातील संदीप जयराम खानविलकर ya
विज ग्राहकाला जळलेला मीटर नवीन मिळण्यासाठी तब्बल सहा दीवस अंधारात रात्री काढल्यानंतर वीज मिटर देण्यात आला होता. तो देखील नवीन नाही तर जुना मीटर विज महावितरण कंपनी कडून दिला होता तालुक्याच्या विज मंडळाकडे एखादा नवीन मीटर स्पेअरला नाही याचे आश्चर्य जनतेतून केले जात असुन या अजब कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे .
लांजा तालुक्यातील जनतेला विजेच्या सतत होणा-या त्रासाला सामोरे जावे भाग पडत आहे .मात्र संबधित यंत्रणेनेच्या कामामध्ये सुधा विज ग्राहकांना सुरळीतपणे विज पुरवठा कसा मिळेल ग्रामीण भागातील जनतेच्या विजेच्या समस्या जाणुन घेऊन तात्काळ कार्यवाही होताना दिसुन येत नाही याबाबत मुचकुंदी परिसर विकास संघ उपाध्यक्ष गणेश शांताराम खानविलकर यानी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.








