बँक ऑफ इंडिया चिपळूण येथे क्रेडिट आऊटरिच शिबिराचे आयोजन

कमी व्याज दरामुळे ग्राहक आकर्षित

चिपळूण (प्रतिनिधी) : बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना कर्ज मिळावे तसेच त्यांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून आणि ग्राहकांच्या समाधानाला सर्वोच्च प्राधान्य देवून विविध बँकिंग उत्पादन आणि सेवा मिळण्यासाठी बँकेकडून सदैव प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन झोनल प्रबंधक नरेन्द्र देवरे यानी केले.

 

येथील बँक ऑफ इंडियाच्या चिपळूण शाखेमार्फत शहरातील हॉटेल अतिथीमध्ये क्रेडिट आऊटरीच कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल प्रबंधक नरेन्द्र देवरे बोलत होते.

 

 

या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडियाचे एस.एम.ई.सी.सी. रत्नागिरी प्रमुख राजी सिंग, आर.बी.सी. हेड शुभम सिन्हा, चिपळूण शाखा चीफ मॅनेजर सर्फराज पटेल, अधिकारी अश्विन चौधरी व बँकेशी संबंधित सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

श्री. देवरे पुढे म्हणाले की, या शिबिरामुळे ग्राहकांच्या ज्या सूचना असतील त्याची अंमलबजावणीचा प्रयत्न केला जाईल. तसेच रजिस्टरमध्ये मोबाईल नंबर व नाव नोंदवावे. यामुळे आपल्याला बँकेच्या योजनांचा माहिती मेसेजद्वारा पाठविणे सुलभ होईाल. बँकेकडून रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या ग्राहकांचा सिबिल रिपोर्ट चांगला असेल त्यांना तात्काळ कर्ज देण्यात येईल. यामुळे बँकेला चांगले ग्राहक मिळतील असे म्हणाले.

 

यानंतर एस.एम.ई.सी.सी. रत्नागिरी हेड राजीव सिंह यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यात ५९ शाखा आहेत. यावेळी बँकेने काही आकर्षक फायनान्स योजना आणल्या आहेत. त्यामध्ये डॉक्टर यांना जमीन खरेदी करण्यासाठी किंवा इन्स्ट्रुमेंटसाठी कमी व्याज दरात कर्ज दिले जाणार आहे. तसेच असेट बँक फायनान्स प्रॉपर्टी ही योजना प्रॉपर्टी वर कर्ज दिला जाणार आहे. गेल्या आठवड्यात थाला फायनान्स योजना आली असून यामध्ये भाडे तत्त्वावर दिलेल्या प्रॉपर्टीवर मग ती कमर्शिअल असो किंवा रेसिडेंट या प्रॉपर्टीवर सुद्धा फायनान्स उपलब्ध होईल. अधिक माहितीसाठी आपल्या शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

यानंतर आर.बी.सी.हेड शुभम सिन्हा मार्गदर्शन करताना म्हणाले की, बँक विविध प्रमुख योजनांतर्गत कर्ज देण्यास आणि भारत सरकारच्या विविध सामजिक सुरक्षा योजनांना सुलभ करण्यासाठी वचनबद्द आहे. आणि डीजिटलाझेशनद्वारे अधिक वितरित करण्याचा प्रयत्न सुरू राहील असे त्यांनी सांगिले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन चौधरी यांनी केले. या शिबिराला ५० हून अधिक ग्राहक उपस्थित होते. चीफ मॅनेजर चिपळूण शाखा सर्फराज पटेल यांनी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली व उपस्थितांचे आभार मानले.