वेंगुर्ले l दाजी नाईक :सन २०२३-२०२४ मध्ये महसूल विभागातील उप विभागस्तरावर उत्कृष्ट काम करणारे वेंगुर्ले चे तहसिलदार ओंकार ओतारी यांचा “उत्कृष्ट तहसीलदार” म्हणून जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
सिंधुदुर्गनगरी येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून जिल्हा नियोजन समिती सभागृहात महसूल विभागाचा सन्मान सोहळा जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मकरंद देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी श्री मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय अधिकारी महसूल,कणकवली चे श्री. जगदीश कातकर, उपविभागीय अधिकारी महसूल, कुडाळ च्या श्रीमती ऐश्वर्या काळुसे, तहसिलदार महसूल, सिंधुदुर्ग च्या श्रीमती प्रज्ञा काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्वच मान्यवरांनी तहसीलदार श्री ओतारी यांच्या कामाचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












