खेड(प्रतिनिधी) शहरातील दापोलीनाका येथे मानवी वस्तीत घुसलेल्या मगरीला सुखरूपरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून सुकतळे येथे मगरींचा वावर वाढला आहे. पाण्याबाहेर येणाऱ्या मगरींना पकडण्यासाठी पिंजराही लावण्यात आला आहे. दापोलीनाका येथे मानवीवस्तीत मगर घुसल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व छत्रपती वाईल्ड लाईफ फाऊंडेशनच्या पथकाने ३ फुट लांबीच्या मगरीला सुखरूपरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.











