चिपळूण (प्रतिनिधी):– शिरगाव ते चिपळूण रेल्वे स्थानक एसटी सेवा सुरू करण्या बाबत आगार व्यवस्थापक दिपक चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. त्या वेळी त्यांनी सप्टेंबर अखेर पर्यन्त वरिष्ठांशी चर्चा करून एसटी सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन देताना भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्राताई चव्हाण, भाजपा चिपळूण शहर मंडळ अध्यक्ष श्रीराम शिंदे, भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सौ. सारिका भावे, युवा मोर्चा शहर मंडल सरचिटणीस अभिजीत सावर्डेकर, शिरगाव ग्रामस्थ सुरज शिंदे, जितेंद्र शिंदे, रोहित शिंदे, संतोष नाचरे, राहुल पास्ते आदी उपस्थित होते.
यावेळी शिरगावचे माजी उपसरपंच अशोक भागडे यांनी शिरगाव पंचक्रोशीतील रेल्वे प्रवाशांच्या व्यथा व सदर ची एस.टी. सुरू केल्यास एस.टी. महामंडळाला भविष्यात होणारा आर्थिक नफा अश्या दोन्ही बाजू अधिकाऱ्यानं समोर मांडल्या.











