ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे देऊळवाडी येथील सदानंद गावकर वय 48 यांचे पहाटे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. सदानंद याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ सावंतवाडी येथे डॉ. चितारी यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचे उपाचारापूर्वीच निधन झाले. सदानंद गावकर हे गावात तात्या या नावाने परिचित होते.ओटवणे गावातील अनेक सामाजिक कार्यात सहभाग घेणार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. हसतमुख आणि त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे गावात त्यांचा मोठा मित्रवर्ग होता.
ओटवणे शाळा नंबर एक च्या प्रत्येक कामात त्यांचा नेहमी पुढाकार असायचा शाळेसाठी नेहमीच त्यांचा मोठा आधार होता.ते ओटवणे शाळा नंबर 1 व्यवस्थापन कमिटी सदस्य हि होते त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबासाह मित्रपरिवाराला हि मोठा धक्का बसला त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत गावकर कुटुंबियांचे सांत्वन केले.त्यांच्या पच्चात पत्नी, दोन लहान मुले,चार भाऊ,बहीण,भावजय पुतणी पुतणे असा मोठा परिवार आहे येथील सुभाष गावकर, प्रभाकर गावकर, बाळा गावकर, प्रकाश गावकर यांचे ते लहान भाऊ होय.












