सावंतवाडी । प्रतिनिधी : अध्यापक संघाचे कार्य कौतुकास्पद आहे. आपण विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला अशा वक्तृत्व स्पर्धेतून प्रेरणा व प्रोत्साहन देऊन शैक्षणिक स्तर उंचावण्याचे फार मोठे मौलिक कार्य करत आहात. यासाठी आपणा सर्व संघाच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे गौरवोद्गार माजी जिल्हा बँक संचालक तथा माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोद कामत यांनी काढले.
सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित व माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत वक्तृत्व स्पर्धा नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी अशा स्पर्धा पुरस्कृत करून विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी दिल्याबद्दल गुरुनाथ पेडणेकर यांचेही कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश सुकी, प्रमुख अतिथी अजय शिंदे, पुरस्कर्ते गुरुनाथ पेडणेकर, काष्ट्राइब संघटना अध्यक्ष संजय पेंडुरकर , माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, भाऊसाहेब चौरे, दिगंबर मोर्ये, संजय शेवाळे, वासुदेव हळदणकर सावंत , मधुकर देसाई , आत्माराम गावडे, विनेश गवस आदी उपस्थित होते.
इयत्ता पाचवी ते सातवी लहान गटात प्रथम क्रमांक सानिका आत्माराम नाईक यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल द्वितीय क्रमांक समृद्धी जयराम देसाई डेगवे हायस्कूल तृतीय क्रमांक मीरा मकरंद आपटेविद्यामंदिर कनेडी कणकवलीउत्तेजनार्थ प्रथम चिन्मय विक्रम कोटणीस कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी उत्तेजनार्थ द्वितीय कृष्णा संदेश पालव जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर ४ मोठा गटप्रथम क्रमांक माधुरी महेश राऊळ कलंबी हायस्कूल सावंतवाडी द्वितीय क्रमांक मृदुला नाना सावंत दिव्य ज्योती डेगवे तृतीय क्रमांक रिया मंगेश धुरी बॅरिस्टरनाथ पै कुडाळ तर उत्तेजनार्थ प्रथम श्रावणी राजन आरोंदेकर कुडाळ स्कूल द्वितीय प्रणाली राजन घाटकर आरपीडी सावंतवाडी यांनी प्राप्त केले.
पारितोषिक वितरण माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे तसेच गुरुनाथ पेडणेकर, विनोद गावकर , दिगंबर मोर्ये यांच्या उपस्थितीत करण्यात आले. स्पर्धेला उत्स्फूर्त असा सहभाग मिळाला. मोठ्या गटातून २५ व लहान गटात ३० स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी सांगेलकर बांदा हायस्कूल पाटील सर व संजय शेवाळे यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल विशेष गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा शिक्षक विनोद चव्हाण व अध्यक्ष दिगंबर मोर्ये यांचा विशेष गौरव करण्यात आला.
परीक्षक म्हणून प्रा. डॉ. निवृत्ती कार्वेकर , सीमा एकनाथ मोरजकर, गौरवी गुरुनाथ पेडणेकर, गुरुनाथ नार्वेकर यांनी काम पाहिले. प्रास्ताविक दिगंबर मोर्ये, सूत्रसंचालन सुविधा पालव तर आभार संजय शेवाळे यांनी मानले.











