खेड(प्रतिनिधी) शहराजवळील भरणेनाका येथे वंचित बहुजन आघाडीने लावलेल्या शुभेच्छा फलकाची कोणीतरी अज्ञात माथेफिरूने नासधूस केली असल्याची तक्रार येथील वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गिरीश | गमरे व महासचिव सुरज जाधव यांनी खेड पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, दिनांक ०५ ऑक्टोबर २०२४ रस्त्यालगत होर्डिग्जलावण्यात आले होते. ते होर्डिग्ज कोणीतरी रोजी भरणेनाका येथील पक्षकार्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने व नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने पक्षाच्यावतीने हार्दिक शुभेच्छा देणारे होर्डिंग्ज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६ गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या ओव्हरब्रिजच्या कडेला तसेच खेड शहराकडे येणाऱ्या
अज्ञात माथेफिरूने फाइन काढून टाकले आहे व होर्डिग्जची रिकामी फ्रेम जागेवर जशीच्या तशी ठेवली आहे. असा प्रकार वारंवार घडू नये याकरिता अशा अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.









