दोडामार्ग । प्रतिनिधी : डाक विभाग कोनाळकट्टा येथे १ डिसेंबर २०१५ रोजी अर्जुन विश्वास इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार कोनाळकट्टा येथील डाक विभागातील खातेदारांच्या खात्यामधील सुमारे १ कोटी १० लाख ८२ हजार३४१ रुपये रक्कमेचा अपहार झाल्याचे उघड झाले होते. त्याप्रकरणी सुरेश वासुदेव बांदेकर (रा. कोनाळकट्टा,बांदेकरवाडी ता.दोडामार्ग ) हनुमंत शंकर धुरी (कोनाळकट्टा, बांदेकरवाडी ता.दोडामार्ग ) मानसी निलेश गंगावणे (रा. भाटवाडी, वेंगुर्ला ) रमेश रामराव वाघुलकर ( रा. विद्यानगर, परळी, जि. बिड ) यांना १ डिसेंबर २०१५ रोजी भा.द.वि.कलम ४६५,४६७,४६८,४७१,४७२,४७४,४७७(अ),
४०९,४२०,१०९,४०६,४०८,३४ अन्वये अटक करण्यात आलेली होती.
सदर आरोपींची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. फडतरे साहेब यांनी सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. या प्रकरणी आरोपी क्र. १ तर्फे ॲड. अनिल निरवडेकर व ॲड. गणेश चव्हाण यांनी काम पाहिले तर आरोपी क्र. २ ते ४ यांचेतर्फे ॲड. संग्राम देसाई व ॲड. अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
Home सिंधुदुर्ग दोडामार्ग भारतीय डाक विभागात एक कोटीची अफरातफर केल्याप्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता











