भाजपा मधून उबाठा गटात प्रवेश दाखवलेले सुकळवाड येथील सुभाष म्हसकर पुन्हा स्वगृही
खासदार नारायणराव राणे यांची मालवण येथे भेट घेत आपण राणे साहेबांसोबतच असल्याची प्रतिक्रिया
मालवण | प्रतिनिधी : वैभव नाईक यांनी दोन दिवसांपूर्वी सुकळवाड येथील सुभाष म्हैसकर यांचा उबाठा गटात पक्षप्रवेश दाखवला होता. यावर बोलताना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी सर्व बोगस पक्षप्रवेशाचा पर्दाफाश केला होता. आज सुभाष म्हैसकर यांनी मालवण येथे खा. नारायण राणे साहेबांना भेटले. आपण व सुकळवाड येथील संपूर्ण ठाकर समाज हा राणे साहेबांसोबत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यामुळे वैभव नाईक हे पुन्हा तोंडघशी पडले असून सुकळवाड प्रवेशाचा बनाव उघड झाला आहे. अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, दाजी सावजी व अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.












