कंपनीच्या सी.एस. आर. फंडातून राबविला सामाजिक उपक्रम.
चौके – प्रतिनीधी : – कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनी च्या सीएसआर फंडातून सामाजिक उपक्रम राबवत मालवण तालुक्यातील चौके भ. ता. चव्हाण, म. मा. विद्यालय या प्रशाळेतील 25 विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीचे आयटी हेड श्री दीपेश गोसावी,गोवा ब्रांच मॅनेजर श्री सुरेश साळगावकर आणि श्री संकेत प्रभु देसाई उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कंपनीच्या आयटी हेड श्री. दीपेश गोसावी यांनी सांगितले की, कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड हा पोस्ट आणि बँकेप्रमाणेच गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असून यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता. तुम्ही केलेली छोटी छोटी गुंतवणूक भविष्यात फार मोठा परतावा देऊ शकते. एसआयपी या पर्यायातून तुम्ही छोट्या रकमेतून गुतवणूक कॅनरा रोबेको मध्ये गुंतवणूक करू शकता . लोकांमध्ये पैसे गुंतवण्यासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी कंपनीच्या वतीने मार्गदर्शन शिबिरेही घेतली जातात. याबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी कॅनरा रोबेको असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून गेली दोन वर्षे सिंधुदुर्गातील शाळांमधील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम कंपनी राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत होऊन त्यांचे आरोग्य ही सुदृढ राहावे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या सायकलचा योग्य वापर करून स्वतःची प्रगती साध्य करावी असे प्रतिपादन श्री. दिपेश गोसावी यांनी केले.
यावेळी स्थानिक समिती अध्यक्ष बिजेंद्र गावडे यांनी उपस्थित कंपनीचे हेड दीपेश गोसावी, तसेच ब्रँच मॅनेजर सुरज साळगावकर,संकेत प्रभुदेसाई यांचे स्वागत करून कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक करून कंपनीच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळा पालक संघ उपाध्यक्ष श्यामसुंदर मेस्त्री, मुख्याध्यापिका रसिका गोसावी,पत्रकार अमोल गोसावी, नितिन गावडे, शिक्षक,पालक आदी उपस्थित होते.











