भाजपा प्रदेश चीटणीस सोशल मीडिया प्रभारी श्वेता शालिनी सोमवारी रत्नागिरीत

रत्नागिरी | प्रतिनिधी : भाजपा प्रदेश चिटणीस सोशल मीडिया प्रभारी श्वेता शालिनी सोमवार दि.8 रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत. बूथ सक्षमीकरण अंतर्गत सोशल मीडिया सेल अधिक प्रभावी करण्याचा भाजपा चा प्रयत्न आहे.

रत्नागिरी मधील भाजपा च्या सोशल सेल ची महत्वपूर्ण बैठक श्वेता शालिनी यांच्या उपस्थितीत होणार आहे . प्रमुख पदाधिकारी सोशल मीडिया संयोजक यांचे बरोबर भजपा कार्यालयात सकाळी 11 वाजता ही महत्वपूर्ण बैठक होणार असून श्वेता शालिनी सोशल मीडिया प्रभावी करण्या साठी कार्यकर्ते पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील.
श्वेता शालिनी यांच्या सारख्या प्रदेशा तिल महत्वपूर्ण पदाधिकारी रत्नागिरीत येऊन बैठक घेत आहेत याचे खूप महत्व आहे. सोशल मीडिया प्रभावी करण्यासाठी आवश्यक रचना तसेच मार्गदर्शन यातून कार्यकर्ते प्रभावी माध्यमाच्या वापरा साठी तयार व्हावेत म्हणून हे मार्गदर्शन मोलाचे ठरेल .असे जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन म्हणाले.