बंड्या साळवींची अदृश्य शक्ती सतत ना. उदय सामंत यांच्या पाठीशी होती : आ. किरण सामंत

रत्नागिरी । प्रतिनिधी : पालकमंत्री उदय सामंत यांना विजय मिळवून देण्यामध्ये बंड्या साळवी यांची आतापर्यंत अदृश्य शक्ती होती, ना. सामंत यांच्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. आता ते पक्षातच प्रवेश केला आहे. यामुळे आता ताकद वाढेल आणि आता पालकमंत्री सामंत यांच मताधिक्य एक लाखापर्यंत जाईल असा विश्वास लांजा राजापूरचे आ. किरण सामंत यांनी व्यक्त केला.

उबाठा गटाचे माजी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी ते उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. किरण सामंत म्हणाले कि, येत्या 15 फेब्रुवारीला उभारठ्यातील उरलेले पक्षप्रवेश सुद्धा आम्ही करणार आहोत असं सांगताना या पक्षप्रवेशांमुळे कोणताही नवा जुना वाद होणार नसून राहुल पंडित यांचे जिल्हा प्रमुख पद सुद्धा काढून घेतलं जाणार नाही असा विश्वास किरण सामंत यांनी दिला. तर आगामी निवडणुकांसाठी आपण सज्ज होऊया असेही ते म्हणाले.