रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील पाली येथे पोटात दुखत असल्याच्या नैराश्यातून विहिरीत उडी मारलेल्या प्रौढाचा मृत्यू झाला.ही घटना शनिवार 13 मे रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
बाबाराम रामा सावंत (57,रा.पाली बौध्दवाडी,रत्नागिरी) असे विहिरीत उडी मारुन आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे.बाबाराम सावंत यांना दारुचे व्यसन होते.त्यामुळे त्यांचे पोट दुखत असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना दोन दिवसांपूर्वी पाली येथील सरकारी दवाखान्यात नेउन उपचाार केले होते.परंतू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्या नैराश्यातून त्यांनी वाडीच्या खालील बाजुस असलेल्या विहिरीत उडी मारली.ही बाब त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी त्यांना विहिरीबाहेर काढून पाली ग्रामीण रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.












