केर येथे गारपीटमुळे शेतीची हानी, सरसकट नुकसान भरपाई द्यावी

शेतकरी वर्गातून मागणी

दोडामार्ग | प्रतिनिधी : तिलारी परिसरातील गावात दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात पाउस झाला होता केर येथे गारपीट झाली त्यामुळे काजू आणि इतर पिकाचे नुकसान झाले. काजूचा मोहर गळून पडला. काजू बागायतीवर येथील ग्रामस्थांचा उदरनिर्वाह आहे. केवळ पंचनाने करून काहीच होणार नाही कारण झडलेल्या मोहराला काय निकष लावणार आहेत त्यामुळे काजूच्या प्रतिझाडानुसार सरसकट नुकसान भरपाई द्यावी यासाठी तातडीने निकष तयार करावेत अशी मागणी केर – भेकुर्ली येथील ग्रुप ग्रामपंचायतने व शेतकरी वर्गातून केली जात आहे.

याबाबत दोडामार्ग तहसीलदार यांना निवेदन देणार असल्याचे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी प्रहरशी बोलताना सांगितले आहे