खेर्डी उपसरपंचपदी अभिजित खताते बिनविरोध

चिपळूण (प्रतिनिधी):– शहराखेर्डी ग्रामपंचायत उपसरपंचपदासाठी झालेल्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत अभिजीत खताते यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तत्कालीन उपसरपंच सचिन मोहिते यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच सुगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत खताते यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांती बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडीनंतर बोलताना खताते यांनी, गावात जास्तीत जास्त शासकीय योजना राबविण्यास प्राधान्य दिले जाईल. सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह पॅनेल प्रमुखांच्या मार्गदर्शना ग्रॅव्हीटी पाणी योजनेसह विविध विकास कामांना चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगीतले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव जयंद्रथ खताते, माजी सरपंच सुनिल मेस्त्री, माजी सभापती स्नेहा मेस्त्री, माजी सरपंच प्रकाश पाथरवट, अजित खताते, शशिकांत कासार, विनोद भुरण, विजय शिर्के, बाळा दाते, जयश्री खताते, सचिन मोहिते उपस्थित होते.