खासदार धैर्यशील पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली
रत्नागिरी : राज्यसभेचे खासदार श्री.धैर्यशील पाटील शोक संदेश देताना म्हणाले की , मळलेल्या वाटावरून चालणारे अनेक समाज कार्यकर्ते ,राज्यकर्ते आपण पाहिले मात्र नंदकुमार मोहिते हे गोरगरीब कष्टकरी समाज्याच्या उन्नतीसाठी डोंगरदऱ्यातील काट्याकुट्यातून नवीन वाटा शोधणार असं नेतृत्व मला पाहायला मिळाला. त्यांचं कर्तुत्व पाहता हा सर्वसामान्यांचा “देवमाणूस” होता असंच म्हणावं लागेल. माझ्या वडिलांचे म्हणजेच माजी मंत्री मोहन पाटील यांचे ते खूप जवळचे स्नेही होते. मोहिते साहेबांच्या समाजकार्याबद्दल त्यांनी मला खूप माहिती दिली होती. मोहिते साहेबांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा मी दिल्लीला अधिवेशनात असल्यामुळे येता आलं नाही. मोहिते साहेबाने त्यांचं हे कॉलेज पाहण्यासाठी मला खूप बोललो होतो पण दुर्दैवाने त्यांच्या निधनानंतर या त्यांच्या कॉलेजला यावं लागण हे दुर्दैवी आहे .मोहिते साहेबांच्या विचारांचा वारसा आता आपण साऱ्यानीच पुढे नेऊया ,हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे भावपूर्ण उदगार खासदार मा. धैर्यशील पाटील यांनी शोकसभेत व्यक्त केले.
समाजासाठी घरदार सोडणार कणखर नेतृत्व म्हणजे नंदकुमार मोहिते यांच्या निधनामुळे कधी न भरून काढता येणारी पोकळी निर्माण झाली असे शोकपर विचार बळीराजा सेनेचे अध्यक्ष श्रीअशोक दादा वालम यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले की,
नंदकुमार मोहिते यांचे वडील धोंडू मोहिते हे डफावर पोवाडे ,गीत म्हणणारे शाहीर होते. त्यांना पत्नी,दोन मुलगे व दोन मुली व सून असा परिवार होता ते शेतीवर गुजराण करीत उपजीविका भागवत होते. त्याचा आपला धाकटा मुलगा नंदकुमार याना शेतीत मदत न करता त्याचं समाजकारण चालू होत. त्यामुळे किरकोळ भांडण होत होती.ऐन गौरी गणपतीच्या सणा दिवशी त्यांनी नंदकुमार ना सांगितलं की,तुला घरी राहायचं असेल तर एकतर संसार तरी कर नाहीतर घरातून बाहेर पड आणि समाजसेवा कर,
अस वडील रागाने बोलल्यामुळे त्यांनी वडिलांना सांगितलं की समाजसेवा करणार, मला तुमचं घरदार नको.आणि त्याच गणपतीच्या सणादिवशी ते घरातून बाहेर पडले. आईने अडवल ,तू घर सोडणार असशील तर मी पण तुझ्यासोबत येणार, आई पण घरातून बाहेर पडली.आई सोबत दोन तीन दिवस नातेवाईकांकडे काढले. आणि नंतर गावात घर भाड्याने घेऊन तेथे राहिले. माझ्या आयुष्यात असा एकमेव नेता मला पाहायला मिळाला की केवळ समाजसेवेसाठी त्यांनी आपलं घरदार देखील सोडलं.
ते पुढे म्हणाले की,कुणबी, बहुजन समाजातील प्रचंड विद्वत्ता असणारा, संघटन कौशल्य असणारा नेता, या उजाड माळरानावर शैक्षणिक संकुल उभारणारा शिक्षण महर्षी नंदकुमार मोहिते असा मला त्यांचा परिचय माहिती होता .मात्र आज मी त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी घरी गेलो तेव्हा पाहिलं त्यांचं घर म्हणजे कळकाचे वासे ठोकून त्यावर पत्रा टाकलेले साधं दगड मातीचे घर,..मात्र ते घर नसून एखाद्य ग्रंथालय असावं असं सर्व ठिकाणी पुस्तकांनी घर भरलेलं मला पाहायला मिळालं. प्रचंड वाचन उच्च विचार त्याच्यामुळे समाजात फार मोठे नेतृत्व पण राहणीमान मात्र अगदी सर्वसामान्य खूप साध राहणीमान पहायला मिळाल्याच सांगताना ते पुढे म्हणाले की,
बळीराज सेनेच्या स्थापनेत त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता, त्याची मला पूर्णतः जाण होती. बळीराज सेनेच्या माध्यमातून समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवताना मग तो कुळवाटदारांचा असो किंवा तिलोरी कुणबी जातीचा जात पडताळणी विषय असो मुख्यमंत्र्यांसमोर हे विषय मांडण्यासाठी मीच मोहिते साहेबांना सांगत असे आणि ते त्या विषयाची अभ्यासपूर्वक मांडणी करत असत. मला नेहमीच वाटायचं की बळीराज सेना पक्ष जर सत्तेत आला तर नंदकुमार मोहिते यानाच शिक्षणमंत्री करावं असं नेहमी वाटायचं. असं मत बळीराज सेनेचे अध्यक्ष अशोकदादा वालम यांनी व्यक्त केलं.
यावेळी समाजनेते सुरेश भायजे, कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हस्कर , श्री. शिवराम महाबळे, संस्थेचे सचिव श्री.थूळ सर, यांनी शोकसंदेशपर विचार व्यक्त केले.