वेंगुर्ले : प्रतिनिधी :वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावचे सुपूत्र ॲड. प्रथमेश दीपक नाईक यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड. प्रथमेश नाईक हे गेले अनेक वर्षे वकील म्हणून यशस्वीपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी वेंगुर्ले तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्यायालयात आपला वकिली व्यवसाय केला आहे. त्यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल ॲड. प्रथमेश नाईक यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. नोटरी व्यवसायाची सुरुवात ते दिनांक ३० मार्च २०२५ रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फ्लॅट नंबर ११२ पाटील चेंबर, दाभोली नाका, वेंगुर्ला येथे करीत आहेत.











