सिंधुदुर्ग महाविद्यालय माजी विद्यार्थ्यांची आज सहविचार सभा

मालवण | प्रतिनिधी : कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचालित मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हिरक महोत्सवी वर्ष सांगता सोहळा 26 एप्रिल रोजी साजरा होत आहे. हीरक महोत्सवी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार १८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता सर्व माजी विद्यार्थ्यांची सहविचार सभा महाविद्यालयाच्या हीरक महोत्सव स्वागत कार्यालय (प्राध्यापक कक्षात)आयोजित करण्यात आली आहे. तरी उपस्थित राहावे. असे आवाहन प्राचार्य शिवराम ठाकुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.