आमदार निलेश राणे यांच्या हस्ते वायरी-भूतनाथ नूतन ग्रामपंचायत इमारतीचे 19 एप्रिल रोजी भूमिपूजन

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आमदार निलेश राणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थित असणार आहे. तरी या कार्यक्रमास वायरी भूतनाथ गावातील महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधींनी व सर्व आजी-माजी ग्रामपंचायत सदस्यांनी व ग्रामस्थांनी वायरी भूतनाथ गावाच्या विकासासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.