खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के या विद्यार्थ्याचे विंचू दंशाने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली
सोहम शिर्के याला ११ जून रात्रीच्या सुमारास विंचू दंश झाला होता. त्याला नातेवाईकानी नजीकच्या तळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले असता अधिक उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेले दोन दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र या उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.
दरम्यान सोहम शिर्के हा तळे हायस्कूल येथून यावर्षी दहावी उत्तीर्ण झाला होता. मात्र त्याच्या या निधनाने तळे कासारवाडी व परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.