BREAKING: रत्नागिरी शहरानजीक अज्ञात गाडीच्या धडकेत वासराचा मृत्यू

उदयम नगर परिसरातील घटना
मोठी गर्दी जमा; पोलीस घटनास्थळी दाखल 

रत्नागिरी । शहर वार्ताहर
एकीकडे रत्नागिरी शहरानजीक फणसवळे परिसरात तब्बल दीड टन गोवंशाचे मांस आढळून आल्याने हिंदू संघटना आक्रमक झाल्या असतानाच रविवारी रात्री रत्नागिरी शहर नजीक उद्यम नगर येथील अल्ट्रा टेक कंपनीजवळ एका वाहनाच्या धडकेत वासराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरात गर्दी जमा झाली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत

या घटनेनंतर चालक पसार झाला असून अधिक तपास सुरू आहे