मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडतोय. मात्र पावसामध्ये सातत्य नाहीये.

असं असताना आता 24 जून ते 28 जून या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट मुंबईच्या वेधशाळा कडून प्राप्त झाला आहे. यामध्ये 24, 25, 26 आणि 28 या तारखांना रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर 24 आणि 27 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे या कालावधीमध्ये या दोन्ही जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.













