चिपळूण (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवार दि. २९ जून रोजी सायंकाळी ४ वाजता चिपळूण आणि परिसरातील शाळा महाविद्यालायातील १० वी १२ वी आणि पदवी प्राप्त केलेल्या प्रत्येक शाळेतील पहिल्या तीन ब्राह्मण विद्यार्थ्यांचा तसेच शिष्यवृत्ती प्राप्त करणाऱ्या सर्व ब्राह्मण विद्यार्थ्यांचा गौरव केला जाणार आहे. तसेच ९वी आणि १० वी च्या वार्षिक परीक्षेत संस्कृत १०० गुण या विषयात विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही गौरव केला जाणार आहे. ज्यांचा गौरव केला जाणार आहे अशी नावे शाळांकडून प्राप्त झालेली आहेत. आणि त्या विद्यार्थ्याना निमंत्रणे पाठविलेली आहेत.
शहरातील मध्यवर्ती बस स्थानका मागे ब्राह्मण सहाय्यक संघाच्या कै. बाबासाहेब बेडेकर सभागृहात हा समारंभ होणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे माजी एअरमार्शल हेमंत नारायण भागवत उपस्थित राहणार आहेत. चिपळूण मधील शिक्षण प्रेमी नागरिकांनी या समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन चिपळूण ब्राह्मण सहाय्यक संघाच्या संचालकांनी तसेच ब्राह्मण संघाच्या महिला विभागाच्या संचालिकानीही केले आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी तसेच आजी माजी शिक्षकांनी अवश्य उपस्थित रहावे












