घरडा इन्स्टिट्यूटच्या सिव्हिल विभागास ‘एनबीए’ मान्यता
चिपळूण (प्रतिनिधी) : कोकणाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले आणि ज्ञानदानाची दीपशिखा चेतवणारे घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (GIT) हे नाव आज शिक्षणाच्या नकाशावर अधिक तेजस्वीपणे झळकत आहे. संस्थेच्या सिव्हिल अभियांत्रिकी विभागास यंदा एनबीए (NBA) ची मान्यता प्राप्त झाली असून, ही मान्यता म्हणजे गुणवत्ताप्राप्त अभियांत्रिकी शिक्षणाचे प्रतीक आहे. या मान्यतेने विभागाच्या शैक्षणिक शिस्तीला, प्राध्यापकांच्या गुणवत्ता-प्रधान मार्गदर्शनाला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिकृत मान्यता प्राप्त झाली आहे. यापूर्वीच संस्थेने NAAC कडून A ग्रेड मिळवले होते आणि आता सिव्हिल विभागासाठी NBA मान्यता मिळाल्याने ही वाटचाल खऱ्या अर्थाने अभिमानास्पद ठरली आहे.
या विभागात तंत्रज्ञानाची उंची गाठलेले, संशोधन व उद्योगजगतात अनुभवलेले, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ प्राध्यापकांचे समृद्ध मार्गदर्शन लाभते. ९ लाखांपर्यंतच्या पॅकेजसह आकर्षक नोकरी संधी मिळवून देणाऱ्या यशस्वी प्लेसमेंट्स ही विभागाची खास ओळख बनली आहे. इथे केवळ शिक्षण नव्हे, तर उद्योगाला साजेसे कौशल्य घडवणाऱ्या आधुनिक प्रयोगशाळा विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाला वास्तवाचे अधिष्ठान देतात. शिक्षणाचा उद्देश केवळ पुस्तकापुरता न राहता प्रत्यक्ष अनुभवातून शिकलं पाहिजे या विश्वासाने विभागाने विविध नामवंत बांधकाम कंपन्यांशी सामंजस्य करार (MoUs) करून विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप व प्रशिक्षणाच्या संधी खुले केल्या आहेत. ISRO अंतर्गत IIRS Outreach Centre च्या माध्यमातून GIS क्षेत्रातील मोफत कोर्सेस विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. याशिवाय Revit, E-Tabs, StaadPro, GIS अशा आधुनिक सॉफ्टवेअरचं प्रात्यक्षिक प्रशिक्षणही दिलं जातं- जे उद्योगाच्या वास्तवाशी विद्यार्थ्यांना जोडून देतं.
विद्यार्थ्यांचे समाजाशी नाते अधिक दृढ व्हावे यासाठी विभाग सामाजिक प्रकल्प, ऑडिट्स, व कन्सल्टन्सीच्या माध्यमातून ‘समर्थ नागरिक अभियंते’ घडवत आहे. विभागाचे माजी विद्यार्थी सरकारी क्षेत्रात, खासगी उद्योगात तसेच यशस्वी उद्योजक म्हणून आज देशभरात कार्यरत आहेत. विभागास महाराष्ट्र शासनाकडून “उन्नत महाराष्ट्र अभियान” अंतर्गत मान्यता प्राप्त आहे – जे विभागाच्या समाजाभिमुख कार्याची पावती आहे.
GIT मधील सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण हे केवळ पदवी न मिळवता, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवणारे ठरते. येथे सामाजिक जाणीवा जागृत करणारे शिक्षण, व्यक्तिमत्त्व व संवाद कौशल्य विकसित करणारी प्रशिक्षणपद्धती, तसेच स्पर्धात्मक जगाशी दोन हात करण्यासाठी सज्ज करणारी शिकवणी दिली जाते. शैक्षणिक गुणवत्ता आणि उद्योगजगतातील संधी यांचा सेतू बांधणाऱ्या या विभागाचे टॉप रिक्रूटर्स म्हणजे Infosys, Indovance, QSpiders, Knest, Maxval, PinClick, ACC, Eleation, NJS यांसारख्या आघाडीच्या कंपन्या. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे चीज होणाऱ्या उल्लेखनीय संधी उपलब्ध होतात. अधिक माहितीसाठी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लवेल, ता. खेड, जि. रत्नागिरी, संपर्क: ९५५२७००८८८ / ७९७२९१४४६३ येथे संपर्क साधावा. ज्ञान, तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम असलेल्या घरडा इन्स्टिट्यूटच्या सिव्हिल विभागाची ही गुणवत्ता-परंपरा विद्यार्थ्यांना ‘सामर्थ्यवान अभियंते’ म्हणून घडवत आहे. आजचा दिवस हा विभागासाठी नव्हे, तर कोकणातील गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षणासाठी सुवर्णक्षण ठरत आहे.











