प्रांताधिकारी वैशाली पाटील यांचे खेडमध्ये स्वागत

खेड | प्रतिनिधी : 

खेड तालुक्याच्या नूतन प्रांताधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सन्मानीय वैशाली पाटील मॅडम यांचे खेड येथे शिवसेनेतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना उपनेते मा. संजय कदम यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले आणि त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी खेड शहरप्रमुख कुंदन सातपुते, उपशहरप्रमुख प्रेमल चिखले, नगरसेवक राजू संसारे, अकुंश विचारे, राजू आंबे, तुषार सापते, शुक्लेंद्र काते, सोहम कविटिया, निहार घोडे, आर्यन खामकर, कृष्ण वनारसे, पराग बांदीवडेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.