आनंदराव पवार महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण

चिपळूण (प्रतिनिधी) : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित श्री आनंदराव पवार महाविद्यालयात गुरुवार दि. १३ ऑगस्ट रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुणे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे संचालक विलास चिपळूणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत, ध्वजगीत तसेच महाराष्ट्र राज्यगीत सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे विलास चिपळूणकर यांनी स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेले बलिदान तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. या कार्यक्रमाला श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाहक व कॉलेज कमिटीचे चेअरमन मल्लेश लकेश्री, संचालक शालिग्राम उर्फ राजूशेठ विखारे, मुख्य कार्यकारी अधिकारी व बांधकाम समिती प्रमुख सुहास चव्हाण, जनसंपर्क अधिकारी (पी.आर.ओ.) योगेश चौगुले, रजिस्ट्रार अजित खेडेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. अरुणा सोमण यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.