रत्नागिरी जिल्ह्यात आज सरासरी ४५.७६ मिमी पावसाची नोंद

मंडणगडमध्ये सर्वाधिक पाऊस
रत्नागिरी: १६ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असून, जिल्ह्याची एकूण सरासरी ४५.७६ मिमी नोंदवली गेली आहे. आज जिल्ह्यात एकूण ४११.९० मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये मंडणगड तालुक्यात सर्वाधिक, ८८.७५ मिमी पावसाची नोंद झाली.
आज सकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार, चिपळूणमध्ये ८३.२२ मिमी, खेडमध्ये ६०.४२ मिमी, संगमेश्वरमध्ये ५४.१६ मिमी आणि दापोलीत ५०.७१ मिमी पावसाची नोंद झाली. तर राजापूरमध्ये ४०.६२ मिमी, लांजामध्ये ३४.२० मिमी, गुहागरमध्ये २४.०० मिमी आणि रत्नागिरी तालुक्यात १६.४४ मिमी पाऊस पडला.
जिल्ह्यात सर्वदूर कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.