मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य रक्तदान शिबिर संपन्न

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात शहर भाजपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे, भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत, याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी येथे हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना युवराज लखमराजे भोसले यांनी, “मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस सामाजिक जाणीवांचा आहे आणि यानिमित्ताने पवित्र असं रक्तदान केलं जात आहे,” असे मत व्यक्त केले.

भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमच्या रक्तात राष्ट्रभक्ती आहे. त्यामुळेच रक्तदान शिबिराचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. सिंधुदुर्गातही मोठ्या संख्येने दात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याचे पाहून आनंद होत आहे.” वैद्यकीय अधीक्षक डॉ. ऐवळे यांनी या सामाजिक उपक्रमासाठी दात्यांचे आणि आयोजकांचे आभार मानले.

या शिबिरात उपस्थित असलेल्या अनेक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत सहभाग घेतला.

यावेळी युवराज लखमराजे भोसले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्यासह भाजप शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मंडळ अध्यक्ष स्वागत नाटेकर, संतोष राऊळ, पंकज पेडणेकर, रविंद्र मडगावकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, मनोज नाईक, माजी सभापती मानसी धुरी, शर्वाणी गांवकर, उन्नती धुरी, दिपाली भालेकर, सुकन्या टोपले, मेघना साळगावकर, ॲड. संजू शिरोडकर, प्रविण देसाई, मधूकर देसाई, दिलिप भालेकर, संजय शिरसाट, नागेश जगताप, बंटी जामदार, अमित गौंडळकर, जितेंद्र गावकर, हितेन नाईक आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.