श्री सुकाई देवी देवस्थान तळवली यांचे आयोजन
गुहागर प्रतिनिधी
तालुक्यातील तळवली येथे श्री सुकाईदेवी ग्रामदेवता देवरस्थान तळवली यांच्या वतीने 3 ऑगस्ट रोजी भव्य सामूहिक गावठी बैल नांगरणी स्पर्धा पर्व 2 चे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाभरातील नामवंत बैलजोडी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासाठी 10000/- रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल,तसेच व्दितीय क्रमांकास 7000 रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल,आणि तृतीय क्रमांक 5000 रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल,तसेच चतुर्थ क्रमांक 3000 रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल, पंचम क्रमांक 2000 रोख रक्कम व आकर्षक मानाची ढाल, एकूण 10 क्रमांकांसह दोन विशेष सुंदर जोडी बक्षिसे देखील जाहीर करण्यात आली आहेत. प्रत्येक विजेत्याला रोख रक्कम आणि मानाची ढाल प्रदान करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी 400 प्रवेश फी असून नावनोंदणीची अंतिम तारीख 1 ऑगस्ट आहे.तरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहिती आणि नोंदणीसाठी प्रदीप चव्हाण 7744080376 , गणपत शिगवण 7056882225 ,अभिषेक सांगळे 7083725620 संपर्क साधण्याचे आवाहन श्री सुकाई देवी ग्रामदेवता कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.












