माखजन मराठी शाळेचावर्धापन दिन उत्साहात साजरा

गौरव पोंक्षे l माखजन :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील, माखजन मराठी शाळेचा १६३ वा वर्धापन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.१ ऑगस्ट १८६३ रोजी पारतंत्र्याच्या काळात सुरू झालेल्या या शाळेने अनेक विद्यार्थी घडवण्याचे काम केले.

यानिमित्त रानभाज्या प्रदर्शन, चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा घेण्यात आली १ ते ७ चे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते.गत वर्षी स्पर्धा परीक्षा मध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.याच दिनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती असल्याने,त्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.विद्यार्थ्यांनी देखील आपले विचार मांडले.

यावेळी,मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका काय असावी यावर केंद्रप्रमुख दत्ताराम गोताड यांनी अनमोल मार्गदर्शन केले.या प्रसंगी मुख्याध्यापक सौ नांदीवडेकर बाई, शिक्षक मितेश पळे, रवींद्र घाणेकर, सौ सुप्रिया जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ शामल सागवेकर आणि पालक वर्ग उपस्थित होता