दोन संशयितांना रेल्वे स्थानकावरून अटक
रत्नागिरी | प्रतिनिधी
मिरकरवाडा येथील एका दुकानात कामासाठी आलेल्या कामगाराचा त्याच्याच दोन साथीदारांनी सुतारकामासाठी वापरल्या जाणाऱ्या आरीने निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शनिवारी संध्याकाळी 4च्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते
प्रिन्स सहानी (वय 26, रा. गोरखपूर, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या कामगाराचे नाव असून तो आपल्या तिघा साथीदारांसह मिरकरवाडा येथे एका दुकानाच्या कामासाठी आला होता. मात्र त्यांच्यातील वाद इतका टोकाचा गेला की त्याच्याच दोन साथीदारांनी प्रिन्सवर सुतार आरीने हल्ला करून त्याचा खून केला.
तिसरा कामगार तिथेच होता
पोलिसांनी तिसऱ्या साथीदाराच्या मदतीने दोन्ही संशयित आरोपींचं लोकेशन ट्रेस करून स्थानकावरून अटक केली आहे.
या भीषण हत्याकांडामुळे मिरकरवाडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे












