सावंतवाडी । प्रतिनिधी : गणेशोत्सवादरम्यान प्रवाशांची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेने मुंबई आणि मडगावदरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गाडी क्र. ०१००४/०१००३ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (ट) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष या नावाने ही सेवा सुरू होणार आहे.
गाडी क्र. ०१००४ मडगाव जंक्शनहून २४ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर २०२५ रोजी दर रविवारी दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासासाठी गाडी क्र. ०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनसहून २५ ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि ८ सप्टेंबर २०२५ रोजी दर सोमवारी सकाळी ०८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.
या गाड्यांना करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, अदवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे या स्थानकांवर थांबा असेल.
गाडीत एकूण २० डबे असतील. यात एक एसी २ टायर, तीन एसी ३ टायर, दोन एसी ३ टायर इकोनॉमी, आठ स्लीपर आणि चार जनरल डब्यांचा समावेश आहे. तसेच, एक जनरेटर कार आणि एक एसएलआर डबा जोडलेला असेल.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केले आहे. या गाड्यांच्या थांब्यांबद्दल आणि वेळापत्रकाविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.











