उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांची पंचायत समिती शिक्षण विभागावरती धडक

चिपळूण (प्रतिनिधी) : तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळेत कायमस्वरुपी शिक्षक नसल्याने त्या त्या गावातील ग्रामस्थांनी उत्तर रत्नागिरी जिल्हा कार्यालयात पत्रव्यवहार केला होता. याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळा मार्गताम्हाणे या शाळेला कायमस्वरूपी शिक्षक मिळावा याकरिता जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि ग्रामस्थांनी पंचायत समिती शिक्षण विभागावरती धडक दिली.
या दोन दिवसांत जिल्हा परिषद शाळा मार्ग ताम्हाणे शाळेला कायमस्वरूपी शिक्षक देण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि ग्रामस्थांना मिळाले आहे. दोन दिवसात कायमस्वरूपी शिक्षक मिळाला नाही तर पुन्हा धडक मोहीम सुरू होईल असे सांगण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती शरद शिगवण, भाजपचे तालुका सरचिटणीस गणेश हळदे, तालुका उपाध्यक्ष सौरभ चव्हाण, तालुका उपाध्यक्षा विजया चव्हाण, जेष्ठ पदाधिकारी गणेश साळवी, सिताराम घाणेकर आदी उपस्थित होते.