रत्नागिरी – ऑगस्ट महिना सुरू होऊनही रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अजूनही कमीच आहे. आज, ७ ऑगस्ट रोजी, जिल्ह्यात एकूण ३१.९९ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी केवळ ३.५५ मिमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक चिंताग्रस्त आहेत.
आजच्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस राजापूर तालुक्यात ८.२५ मिमी झाला, तर त्या खालोखाल लांजा तालुक्यात ६.०० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या रत्नागिरी शहरात ४.५५ मिमी पाऊस झाला. दुसरीकडे, मंडणगड (२.७५ मिमी), खेड (१.४२ मिमी), चिपळूण (१.४४ मिमी), गुहागर (२.०० मिमी) आणि संगमेश्वर (१.१६ मिमी) या तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी आहे.












