माखजन हायस्कुल येथे शिक्षकांची आरोग्य तपासणी

गौरव पोंक्षे l माखजन :     संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व अ‍ॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी आरोग्य तपासणी करण्यात आली.

ही आरोग्य तपासणी माखजन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.यावेळी एल.एच.एन. श्री एन.एन.आंबवकर,सी.एच.ओ. सागर मुसळे,लॅब टेक्निशियन प्रियांका बने,आरोग्य सेविका मीना घाणेकर,सुचिता शिंदे उपस्थित होत्या.

यावेळी संस्था अध्यक्ष किशोर साठे,सहसचिव दीपक शिगवण,मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे ,गणेश शिंदे व अन्य शिक्षक उपस्थित होते.