देवगड : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देवगड शहरात भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली जामसंडे हायस्कूल ते दिर्बादेवी स्टॉप पर्यंत काढण्यात येणार असून स्वातंत्र्य सैनिक आणि बलिदान दिलेल्या वीरांना आदरांजली वाहण्याचा उद्देश आहे.
ही रॅली गुरुवार, दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता होणार असून नागरिक, व्यापारी, महिला, विद्यार्थी आणि लोकप्रतिनिधी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन भाजप देवगड मंडळाचे अध्यक्ष राजा भुजबळ यांनी केले आहे.












