आ. निलेश राणे यांची शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट

सावंतवाडी । प्रतिनिधी :
कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी उशिरा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी संजू परब यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, शिवसेना उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस, इन्सुली सरपंच तात्या वेंगुर्लेकर, गुरुनाथ सावंत, बंटी पुरोहित, परिक्षीत मांजरेकर, प्रशांत साटेलकर, अभिजीत टिळवे, रोहित नाईक, निखिल सावंत, विनोद सावंत, क्लेटस फर्नांडीस, राकेश पवार, संकल्प धारगाळकर, सत्यवान बांदेकर, अनिल सावंत यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.