मीठमुंबरी शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम
शिरगाव (प्रतिनिधी) – देवगड तालुक्यातील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा मिठमुंबरी नं. १ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून शाळेतील मुलींनी स्वतःच्या हाताने चुलीवर भाकरी बनवण्याचा अनुभव घेतला. पारंपरिक पद्धतीने भाकरी साकारताना त्यांनी ग्रामीण संस्कृतीची ओळख करून घेतली. त्यानंतर सर्वांनी मिळून भाजी-भाकरीचा आस्वाद घेत परंपरेचा गोडवा अनुभवला.
पोषण आहार शिजवून देणाऱ्या शाळेतील मदतनीस सौ. ऋतिका गावकर व सौ. कल्याणी घाडी यांनी मुलांना चुलीवर भाकरी भाजण्याचे प्रात्यक्षिक दाखविले.
या वेळी मिठमुंबरी गावचे सरपंच श्री. बाळकृष्ण गांवकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. हेमंत तोडणकर, मुख्याध्यापक श्री. मधुसुदन घोडे, शिक्षक श्री. सुरेश साळुंखे, श्री. सचिन धुरी, शिक्षिका सौ. आरती ठावरे, पालक श्री. विद्याधर गांवकर उपस्थित होते.
ग्रामीण परंपरेची जाण आणि जीवनकौशल्य शिकविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरला.
फोटो कॅप्शन : मिठमुंबरी प्रशालेतील विद्यार्थिनींनी चुलीवर भाकरी बनवण्याचा अनुभव घेतला.













