दैवज्ञ हितवर्धक समाज, दैवज्ञ महिला मंडळ यांच्या विद्यमाने झाले मंगळागौरी पूजन

रत्नागिरी :_दैवज्ञ हितवर्धक समाज रत्नागिरी आणि दैवज्ञ महिला मंडळ यांच्या विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तिसऱ्या मंगळवारी मंगळागौरी पूजन दैवज्ञ भवन रत्नागिरी येथे संपन्न झाले यजमान म्हणून मंगळागौरी पूजेसाठी सौ केतकी किशोर कारेकर यांनी पूजन केले रविवार दिनांक 10 ऑगस्ट रोजी प्रतिवर्षीप्रमाणे महिला मंडळांनी नाना शंकर शेठ पुण्यतिथी चा कार्यक्रम तसेच सकाळी उदक शांती आणि सत्यनारायण पूजेचे ही आयोजन केले होते सायंकाळी पाच वाजल्यापासून ज्ञाती बंधू भगिनी लहान मुले यांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम केले प्रतीवर्षीप्रमाणे सर्व गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचे बक्षिसे देऊन कौतुकही केले या कार्यक्रमादरम्यान दैवज्ञ पतसंस्थेच्या माध्यमातून डॉ. अक्षय फाटक यांचासायबर संस्कार हा अतिशय उत्तम असा छोटासा कार्यक्रम सादर करण्यात आला दैवज्ञ महिला मंडळ अध्यक्ष सौ केतकी कारे कर माजी अध्यक्ष रुचीता वीरकर ज्योती भुरके महिला, युवा कार्यकर्त्यांनी तसेच दैवज्ञ हितवर्धक समाज अध्यक्ष आणि दैवज्ञ पतसंस्था अध्यक्ष कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले रात्री दहा वाजल्यानंतर अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.