सावंतवाडी राजघराण्यात आयोजन
सावंतवाडी l प्रतिनिधी :माशेल येथील सम्राट क्लबचा वारसा आता खऱ्या अर्थाने गाजत आहे . गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्र, तामिळनाडू येथील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम वारसा ह्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला मिळत आहे. सावंतवाडी संस्थान हे पूर्वीपासून कला प्रेमी संस्थान म्हणून पुऱ्या हिंदुस्थानात प्रसिद्ध होते. तोच वारसा खऱ्या अर्थाने नव्या पिढीने जपला आहे. भोसले राज घराणे हे नेहमीच शास्त्रीय संगीत, तसेच भारतीय कला ह्यांना राजाश्रय देत आली आहे. ह्या वेळेचा वारसा सावंतवाडी राजप्रासादात साजरा होणार आहे.
वारसा ह्या कार्यक्रमाची संकल्पना गोव्यातील प्रसिद्ध गायिका सम्राट प्रचला ताई आमोणकर यांची आहे. सम्राट क्लब माशेलने सलग ४० शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम गोवा, तामिळनाडू, महाराष्ट्र येथे सादर केले आहेत.
संस्थेची ४१ वि मैफील सावंतवाडीच्या राजप्रासादामध्ये शास्त्रीय गायन आणि तबला यांची अनोखी जुगलबंदी रंगणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राजे खेमसावंत भोसले, राणी शुभदादेवी भोसले, युवराज लखमसावंत भोसले, युवराणी श्रद्धा सावंत भोसले, सम्राट क्लब इंटरनॅशनल स्टेट १चे अध्यक्ष सम्राट प्रवीण सबनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज परिवारासमोर आपली कला सादर करण्याची संधी गोव्यातील उदयोन्मुख कलाकारांना मिळणार आहे.
शास्त्रीय गायनाची जुगलबंदी विदुषी प्रचलताई आमोणकर ह्यांच्या शिष्या करणार आहेत. गोव्यातील प्रतिभावंत नवोदित गायिका मैथिली चारी, शरण्या पिसुर्लेकर, शुभ्रा नाईक, रोहिणी वझे, सौ. गीताश्रुती गजानन वझे, कृतिका गावस ४१ व्या वारसा मैफिलीची रंगत वाढवणार आहेत. तबल्याची जुगलबंदी गोव्यातील नामवंत तबला वादक अमित प्रतापराव भोसले आणि त्यांचे शिष्य सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला हार्मोनियम साथ आकाश जल्मी, अक्षय गावडे तसेच तबला साथ सम्राट मिलिंद परब करणार आहेत. सम्राट क्लबचे अध्यक्ष मंगेश गावकर, कार्यक्रम निर्मात्या आणि संचालिका प्रचलताई आमोणकर ह्यांनी सावंतवाडी तसेच सिंधुदुर्गमधील रसिक प्रेक्षकांनी या मैफिलीला मोठया संख्येने उपस्थिती लावावी, असे आवाहन केले आहे.









