राजापूर | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील प्राथमिक, माध्यमिक गटातील विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळावी, त्यांची वक्तृत्व कला अधिक संपन्न व्हावी या उद्देशाने ’आई आधार केंद्र’ या संस्थेची सात वर्षांपूर्वी स्थापना करण्यात आली होती. अल्पावधीमध्ये या स्पर्धेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता ‘आई आधार केंद्र’ आपले विचार व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. ” असे प्रतिपादन आई आधार केंद्र व ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धेच्या लहान गटामध्ये वेदांत महेंद्र महाडीक (न्यू इंग्लीश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचखरी ) आणि मोठ्या गटामध्ये तिर्था विनोद निंबाळकर ( मीनाताई ठाकरे विद्यामंदिर, साडवली, देवरुख) यांनी प्रथम क्रमांक पटकाविले.
ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय ओणीच्या प्रशालेत आई आधार केंद्र आयोजित कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले. यावेळी च्या बक्षिस वितरण समारंभाला
आई आधार केंद्र व ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वासुदेव तुळसणकर, संस्थेचे कार्याध्यक्ष प्रदीप संसारे, उपाध्यक्ष अरविंद गोसावी, कार्यवाह अॅड. गुरुदत्त खानविलकर, संजय सावंत, महादेव धुरे, नारायण शेलार, संचालक नामदेव तुळसणकर, डॉ. शैलेश शिंदेदेसाई, पुष्पलता तुळसणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
महादेव धुरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमामध्ये संजय सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व कै. पार्वतीबाई शंकर तुळसणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या स्पर्धेचे उद्घाटन झाले. लहान गट ( 5 वी ते 7 वी) आणि मोठा गट (8 वी ते 10 वी) अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना जिल्हाभरातील 63 स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या लहान गटामध्ये वेदांत महेंद्र महाडिक (न्यू इंग्लीश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी-चिंचखरी), स्वराज कृष्णदेव कदम (
युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण ), ओजस्वी अभिजित कोळपे (कै. सौ. मीनाताई ठाकरे विद्यामंदिर साडवली, देवरुख) यांनी तर, मोठा गटामध्ये तिर्था विनोद निंबाळकर (मीनाताई ठाकरे विद्यामंदिर, साडवली, देवरुख), स्वरांगी प्रमोद जोशी (युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण), इच्छा सिताराम कदम ( न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी ) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. या कार्यक्रमाला प्रशाळेचे मुख्याध्यापक विनोद मिरगुले, नेहा तुळसणकर, वसंत झोरे, अनिल दैत, ज्ञानेश्वर वाघाटे, कैलास भवारी यांच्यासह मोठ्यासंख्येने शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.












