माखजन हायस्कुल मध्ये हिंदी दिन उत्साहात

माखजन वार्ताहर
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माखजन इंग्लिश स्कूल माखजन व अ‍ॅड पी आर नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिन साजरा करण्यात आला
यावेळी हिंदी भाषेतून शाळा,कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या.विद्यार्थ्यांनी समूह गीते सादर केली.पाचवीतील श्रीकृष्ण साठे याने हनुमान चालीसा सादर केली. प्रा गौस मुल्ला यांनी हिंदी भाषा दिन साजरा करण्या पाठीमागचे महत्व सांगितले.
दरम्यान यावेळी मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,संतोष कुलकर्णी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शिंदे यांनी केले.