गौरव पोंक्षे माखजन
अलीकडेच रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी,पदभार स्वीकारलेल्या एकनाथ आंबोकर यांची माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव दीपक शिगवण यांनी भेट घेतली.याप्रसंगी श्रीरंग कुंभार,अभिजित सहस्त्रबुद्धे उपस्थित होते.
यावेळी एकनाथ आंबोकर यांना बुके देऊन माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.व अन्य शैक्षणिक बाबींवर चर्चा करण्यात आली.
शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचा मूळ गाव आंबव पोंक्षे असल्याने त्याची नाळ आंबवं गावाशी जोडलेली आहे.अनेकदा त्यांचे आंबव पोंक्षे गावात येणे जाणे असते. पर्यायाने माखजन पंचक्रोशीशी निकटचे संबंध असलेल्या,एकनाथ आंबोकर यांना शुभेच्छा देण्यात आल्या.












