न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीच्या शैक्षणिक गरजांसाठी पुढाकार

रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, आर.सी.सी. सेवार्थ व सेवार्थ फाउंडेशन यांनी केली पाहणी

गुहागर प्रतिनिधी
सामाजिक व शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, आर.सी.सी. सेवार्थ व सेवार्थ फाउंडेशन यांनी
न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीच्या शैक्षणिक गरजांसाठी पुढाकार घेत नुकतीच पाहणी केली.
शाळेने केलेल्या मागणीनुसार याठिकाणी डिजिटल क्लासरूम, प्रयोगशाळा, संगणक कक्ष,खेळाचे मैदान,वाचनालय,बहुउद्देशीय सभागृह, सुरक्षितता साधने इत्यादी शाळेच्या असलेल्या गरजा यावेळी रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईड, आर.सी.सी. सेवार्थ व सेवार्थ फाउंडेशनने प्रत्यक्ष भेटीतून जाणून घेत यातील बहुतेक गरजा पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. सेवार्थ सदस्य व माजी विद्यार्थी संदीप चव्हाण यांच्या प्रयत्नाने ही भेट घेण्यात आली.तसेच 10 वीच्या विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ऍप्स देखील तळवली, हेदवी, पालपेणे,पालशेत व ओवळी या शाळांना दिले आहेत.
यावेळी रोटरी प्राईड पुणे क्लब अध्यक्ष अनिल कासोडेकर,रोटरी प्राईड पुणे क्लब सचिव व सेवार्थ फाउंडेशन अध्यक्षा संपदा कुंटे,रोटरी सदस्य,सेवार्थ मार्गदर्शक व उद्योगपती उज्ज्वल कुंटे,आर.सी.सी.सेवार्थ अध्यक्ष व सेवार्थ सदस्य विनोद पाटील,आर.सी.सी. सेवार्थ सचिव व सेवार्थ सदस्य मार्था फिन तसेच मुख्याध्यापक एम. ए. थरकार,सेवार्थ सदस्य व माजी विद्यार्थी संदीप चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण, दिलीप आग्रे,अनंत डावल,प्रज्ञा धामणस्कर, विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.