गुरुपौर्णिमेनिमित्त प्रशांत परांजपे यांचे प्रतिपादन
दापोली l प्रतिनिधी : श्री गजानन महाराज भक्त मंडळ यांच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त दापोली तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन श्री गजानन महाराज मंदिर येथे करण्यात आलं होतं .यानिमित्त प्रमुख मार्गदर्शक म्हणून पर्यावरण अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत परांजपे उपस्थित होते .निसर्ग हाच आपला गुरु आहे आणि जलदेवता ,वनदेवता यांना प्रमाण मानून नेमाने काम करणे अत्यावश्यक असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी दापोली तालुक्यातील दहावी व बारावी च्या प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तर वीस शाळांतील होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू आणि लोकमान्य टिळक हायस्कूल दापोली येथील पाच विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाकरिता आर्थिक मदत मंडळातर्फे देण्यात आली.
प्रदीप सोमण,करंदिकर बाई,युवराज पेठे आदी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात टी.एस.सुब्बुराज यांनी प्रशांत परांजपे यांच्या सुझावांचा मंडळ जरूर विचार करेल असे आश्वासीत केले.
सूत्रसंचालन कमलेशा मुसलोणकर यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेकरिता उपाध्यक्ष प्रतिभा भुवड ,अनंत झिमण,श्री व सौ ताम्हणकर,काजोल भुवड,सविता भुवड आदी भक्त मंडळींनी विशेष परिश्रम घेतले.